कर्नाटकच्या लोकायुक्तांना चाकूने भोसकले ; हल्लेखोर अटकेत

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

''शेट्टी यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे''. 

-  रामालिंग रेड्डी, गृहमंत्री,  कर्नाटक

नवी दिल्ली : कर्नाटकचे लोकायुक्त न्यायमूर्ती विश्वनाथ शेट्टी यांच्यावर चाकूने भोसकून हल्ला केला. न्या. शेट्टी हे एका प्रकरणावर त्यांच्या कार्यालयात सुनावणी घेत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्लेखोराने शेट्टींना तीनवेळा भोसकले. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरास अटक केली.

knife stabbed

याप्रकरणी तेजस शर्मा या हल्लेखोरास अटक करण्यात आली असून, हा हल्ला करण्यामागचे कारण काय, याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. तेजस हा टुमकुर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. न्या. शेट्टी त्यांच्या कार्यालयात सुनावणी घेत असताना तेजसने त्यांना चाकूने भोसकले. या घटनेनंतर न्या. शेट्टी यांना मल्ल्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने शेट्टी यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे सांगितले. दरम्यान, न्या. शेट्टी यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती नेमकी कोण होती, त्याने शेट्टींवर हल्ला का केला, याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही. 

दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री रामालिंग रेड्डी यांनी माध्यमांना सांगितले, की शेट्टी यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली असून, पुढील तपास चालू आहे. 

Web Title: Marathi News National News Crime News Karnataka Lokayukta Justice Vishwanath Shetty stabbed