यमुना एक्सप्रेस वेवरील अपघातात 'एआयआयएमएस'च्या 3 डॉक्टरांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

यमुना एक्सप्रेस वेवर आज (रविवार) भीषण अपघात झाला. या अपघातात 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'च्या (एआयआयएमएस) 3 डॉक्टर आणि 2 महिलांचा मृत्यू झाला.

मथुरा : यमुना एक्सप्रेस वेवर आज (रविवार) भीषण अपघात झाला. या अपघातात 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'च्या (एआयआयएमएस) 3 डॉक्टर आणि 2 महिलांचा मृत्यू झाला. तसेच यामध्ये या संस्थेतील अन्य चौघे जखमी झाले आहेत. ही घटना यमुना एक्सप्रेस वेवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.  

AIIMS hospital

आग्रापासून दिल्लीला हे सात डॉक्टर त्यांच्या एसयूव्ही कारने जात होते. यादरम्यान हा अपघात पहाटे अडीचच्या सुमारास झाला. या अपघातात तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 2 महिलांचा मृत्यू झाला. मृतातील सर्व डॉक्टर एआयआयएमएस ट्रॉम सेंटर असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक आदित्यकुमार शुक्ला यांनी दिली. यामध्ये चौघे जखमी झाले. त्यानंतर या जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील मृतांची ओळख पटली असून, डॉ. यशप्रित, डॉ. हेरंबला आणि डॉ. हर्षद डॉक्टरांचा मृत्यू झाला. 

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर यातील जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Marathi News National News Crime News Yamuna Express Way Accident AIIMS 3 Doctors Dead