पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

'संबंधित आरोपीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील माहिती मिळू शकेल. तसेच शवविच्छेदनाचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार व्हिडिओ चित्रिकरण केले जाणार आहे''. 

संजीव अरोरा, पोलिस अधीक्षक , संबलपूर

भुवनेश्वर : चोरीच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आदिवासी तरुणाने पोलिस कोठडीतच आत्महत्या केली. त्याने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोपीच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. ही घटना ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात घडली.

भालापूरी गावात राहणाऱ्या अबिनाश मुंडा या आदिवासी तरूणाला चोरीच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याला येथील ऐंथपल्ली पोलिस ठाण्यात कोठडी सुनावली होती. पोलिसांनी त्याला पोलिस कोठडीत असताना छळवणूक केली होती. त्यामुळे पोलिसांच्या या त्रासाला कंटाळून पोलिस ठाण्यातच बेडशिटच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. 

याबाबत संबलपूरचे पोलिस अधीक्षक संजीव अरोरा यांनी सांगितले, की ''संबंधित आरोपीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील माहिती मिळू शकेल. तसेच शवविच्छेदनाचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार व्हिडिओ चित्रिकरण केले जाणार आहे''. 

दरम्यान, मुंडा याच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी त्याची मानसिक छळवणूक केली होती. त्यामुळे तो नैराश्येत होता. या नैराश्येतून त्याने आत्महत्या केली, असा आरोप केला. 

Web Title: Marathi News National News Crime News Youth Hang in Police Custody