आता दिल्लीतही  "ज्ञानोबा तुकाराम' 

National News Delhi Varkari saint Tukaram
National News Delhi Varkari saint Tukaram

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांकडून केला जातो तो "ज्ञानोबा तुकाराम'चा गजर आता पंढरपूरपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या देशाची राजधानी दिल्लीतही दुमदुमणार आहे. निमित्त आहे मार्चमध्ये रामलीला मैदानावर होणाऱ्या हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरीच्या सामुदायिक पारायणाचे. भाजप नेते व दिल्ली प्रभारी श्‍याम जाजू हे या उपक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. 

मोदी सरकारच्या काळात दिल्लीतील मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या उपक्रमांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. यापुढच्या एका महिन्यात शिवजन्म सोहळा, वारकरी महामेळा व बाबासाहेब पुरंदरेलिखित "जाणता राजा' या महानाट्याचे प्रयोग यानिमित्ताने राजपथ, जनपथ, इंडिया गेट, रामलीला मैदान व लाल किल्ला या ऐतिहासिक ठिकाणी मराठीची नाममुद्रा लखलखीतपणे उमटणार आहे. तब्बल सहाशे ते सातशे वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या "ज्ञानेश्‍वरी पारायण' सोहळ्याचे अध्यक्षपद अखिल भारतीय वारकरी मंडळाचे हभप प्रकाश बोधले महाराज यांच्याकडे आहे. दरम्यान, सारे केंद्रीय मराठी मंत्री-अधिकारी रामलीला मैदानास भेट देण्याची अपेक्षा आहे. 11 ते 18 मार्च या काळात हा कार्यक्रम होईल. याच काळात संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा उत्तररंगही सुरू असेल. 

त्यामुळे अनेक मराठी खासदारही यासाठी येणे अपेक्षित आहेत. या सात दिवसांत दिल्लीच्या रस्त्यांवरून ग्यानबा तुकारामचा गजर करत ज्ञानेश्‍वरीची दिंडी निघेल. या वारकरी महामेळाव्यानिमित्त रोज संध्याकाळी तुकारामांच्या गाथेवरील विद्वानांची प्रवचने होतील. याशिवाय योगगुरू रामदेव बाबा, साध्वी ऋतंभरा, सुधांशू महाराज, गोविंद गिरी महाराज, दयानंद सरस्वती व हंसदेवाचार्य महाराज आदी नामवंतांचे विचारही दिल्लीकरांना ऐकायला मिळतील. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com