पाकिस्तानच्या गोळीबारात मेजरसह तीन जवान हुतात्मा 

वृत्तसंस्था
शनिवार, 23 डिसेंबर 2017

जम्मू : पाकिस्तानी सैन्याने केलेल्या शस्त्रसंधीच्या भंगात भारतीय लष्कराच्या मेजरसह तीन जवान हुतात्मा झाले. हुतात्मा मेजर प्रफुल्ल अंबादास मोहारकर हे मूळचे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील आहेत. ही घटना राजौरी जिल्ह्यातील केरी भागात नियंत्रण रेषेवर शनिवारी दुपारी घडली. या गोळीबाराला भारतीय लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

नियंत्रण रेषेवर गस्त घालत असलेल्या भारतीय लष्कराच्या पथकाला पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केले. पाकिस्तानच्या बाजूने अचानक झालेल्या गोळीबारात लष्कराच्या मेजरसह तीन जवान हुतात्मा झाले. मेजर प्रफुल्ल अंबादास मोहारकर (वय32), शिपाई परगतसिंह (वय 30), लान्स नाईक गुरमेलसिंग (वय 34) आणि लान्स नाईक गुरमितसिंग अशी हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत. गुरमेलसिंग हे पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील आणि परगतसिंह हे हरियानातील कर्नाल जिल्ह्यातील आहेत. 

पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंगात वाढ 

पाकिस्तानकडून या वर्षी झालेल्या शस्त्रसंधी भंगात ऑक्‍टोबरपर्यंत 12 नागरिक आणि 17 जवान मृत्युमुखी पडले आहे. या वर्षी ऑक्‍टोबरपर्यंत शस्त्रसंधी भंगाच्या 724 घटना घडल्या आहेत. मागील वर्षी शस्त्रसंधी भंगाच्या 449 घटना घडल्या होत्या. यात 13 नागरिक आणि 13 जवान मृत्युमुखी पडले होते. 

Web Title: marathi news national news firing 3 jawan martyr