लालूंना साडेतीन वर्षांची शिक्षा, 5 लाखांचा दंड 

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जानेवारी 2018

सुमारे 950 कोटींचा पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने त्यांना 23 डिसेंबरला दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांना 3 जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र, त्यांची  शिक्षेची सुनावणी सलग तीनवेळेस पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आज त्यांच्या शिक्षेवरील सुनावणी आज पूर्ण झाली असून, न्यायालयाने त्यांना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय त्यांना 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली असून, त्यांना 5 लाखांचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे त्यांची आता कारागृहात रवानगी केली जाणार आहे. 

सुमारे 950 कोटींचा पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने त्यांना 23 डिसेंबरला दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांना 3 जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र, त्यांची शिक्षेची सुनावणी सलग तीनवेळेस पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आज त्यांच्या शिक्षेवरील सुनावणी आज पूर्ण झाली असून, न्यायालयाने त्यांना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय त्यांना 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 

दरम्यान, लालूंच्या वकीलांनी शुक्रवारी विशेष केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) रांचीतील न्यायालयात लालूंना कमीत कमी शिक्षा सुनावली जावी, अशी याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे.

Web Title: marathi news national news fodder scam lalu get jail punishment