समान वेतनच्या मागणीसाठी महिला शिक्षकांचे मुंडन

वृत्तसंस्था
रविवार, 14 जानेवारी 2018

''भाजप सरकारचा आमच्यासाठी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्ही केसदान करून याचा निषेध करत आहोत''

भोपाल : मध्यप्रदेशातील शिक्षकांनी सरकारच्याविरोधात आंदोलन केले. भोपालच्या जंबूरी मैदान येथे महिला शिक्षकांनी मुंडन करुन महिला शिक्षिकांकडून केसदान करण्यात आले. ''भाजप सरकारचा आमच्यासाठी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्ही केसदान करून याचा निषेध करत आहोत'', असे मुंडन करणाऱ्या महिला शिक्षिकांनी सांगितले.

भोपालच्या या शिक्षकांच्या निषेधात चार महिला शिक्षिकांचा सहभाग होता. शिक्षकांना नियमित करण्याबाबत विभागाने निर्णय घ्यायला हवा. त्यामुळे त्या महिला शिक्षिकांनी राज्य सरकारविरोधात आवाज उठवला आहे. राज्यभरातील शिक्षिकांनी 'भारत हेवी इलेक्टिकल्स लिमिटेड' या भागात जमले होते आणि महिलांनी त्याचे मुंडन केले. आझाद अध्यापक संघाचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज वर्मा यांनी सांगितले, की शिल्पी सिवन, सीमा क्षीरसागर, अर्चना शर्मा आणि रेणूका सागर यांनी निषेध करत मुंडन केले.  

Web Title: Marathi news National news Four Women Teachers Tonsure Their Heads In Protest In Madhya Pradesh