साहित्यिक महाश्वेता देवी यांना गुगलकडून 'डुडल' 

वृत्तसंस्था
रविवार, 14 जानेवारी 2018

समाजासाठी खडतर मेहनत घेतली, संघर्ष केला. त्यांनी दलित, आदिवासींच्या दृष्टीने प्रशासनाशी, व्यवस्थेशी संघर्ष केला. त्यांच्या उत्कृष्ठ लेखनाबद्दल 1996 रोजी त्यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा 'ज्ञानपीठ पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले होते. 

नवी दिल्ली : ज्येष्ठ साहित्यिक महाश्वेता देवी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलकडून 'डुडल'च्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली. महाश्वेता देवी यांची आज 92 वी जयंती आहे. त्यांनी समाज कार्यासाठी अतोनात मेहनत घेत लढा दिला.

14 जानेवारी 1926 रोजी बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये महाश्वेता देवी यांचा जन्म झाला. त्यांना डुडलच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली. बंगाली शैलीत साडी नेसून महाश्वेता देवी दिसत आहेत. त्यांच्या गुगलच्या या छवीमागे विविध सभ्यता, संस्कृती, भाषेचा लोकांचा दृष्टीकोन दिसत आहे. महाश्वेता देवी यांनी महिला, दलित आणि आदिवासींच्या अधिकारांसाठी लढा दिला होता.

भारतीय साहित्यातील प्रसिद्ध व्यक्ती अशा साहित्यिक महाश्वेता देवींचे 2016 रोजी वयाच्या 90 व्या निधन झाले. 

त्यांनी समाजासाठी खडतर मेहनत घेतली, संघर्ष केला. त्यांनी दलित, आदिवासींच्या दृष्टीने प्रशासनाशी, व्यवस्थेशी संघर्ष केला. त्यांच्या उत्कृष्ठ लेखनाबद्दल 1996 रोजी त्यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा 'ज्ञानपीठ पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले होते. 
 

Web Title: Marathi news national news google remembers mahashweta devi on her birth anniversary through a doodle