हज यात्रेकरूंसाठी विमानप्रवास होणार स्वस्तात !

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जून 2019

''पंतप्रधान कार्यालयाने याबाबत विचार सुरु केला आहे. विमानाच्या तिकिटावरील कपात ही एअर इंडिया, सौदी अरेबिया आणि फ्लिनस या सौदी अरेबियास्थित लागू होणार आहे. भारतातील 21 विमानतळाहून जेद्दाह आणि मेडिना या विमानतळावर ही सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे".  

- मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री

नवी दिल्ली : हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी केंद्र सरकारकडून दिले जाणारे अनुदान काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी विमान तिकिटात कपात करण्याचा निर्णय केद्र सरकारकडून घेतला जाणार आहे.  

Haj yatra

हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना केंद्र सरकारकडून अनुदान दिले जात होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सरकारने हे अनुदान बंद केले होते. त्यामुळे हजारो हज यात्रेकरूंची मोठी निराशा झाली होती. त्यानंतर आता केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यावर कडक पावले उचलली असून, हज यात्रेकरूंसाठी विमानाच्या तिकिटात कपात करण्यात आली आहे. ''पंतप्रधान कार्यालयाने याबाबत विचार सुरु केला आहे. विमानाच्या तिकिटावरील कपात ही एअर इंडिया, सौदी अरेबिया आणि फ्लिनस या सौदी अरेबियास्थित लागू होणार आहे. भारतातील 21 विमानतळाहून जेद्दाह आणि मेडिना या विमानतळावर ही सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे".  

दरम्यान, केंद्र सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयाचा फायदा हजारो यात्रेकरूंना होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News National News Haj Pilgrims Air Fare Cost Reduces