मानेसर जमीन गैरव्यवहारप्रकरणी हुडा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

हुडा आणि अन्य 34 जणांविरोधात भारतीय दंडविधान कायद्यांतर्गत गुन्हेगारी स्वरुपाचा कट करणे, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांच्याविरोधात शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. मानेसर जमीन गैरव्यवहारप्रकरणी हुडा यांच्यासह अन्य 34 जणांविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. 

Manesar Land

हुडा आणि अन्य 34 जणांविरोधात भारतीय दंडविधान कायद्यांतर्गत गुन्हेगारी स्वरुपाचा कट करणे, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हुडा यांच्याबरोबरच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य चट्टर सिंग यांचेही या आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. हरियानातील 400 एकर जमिनीचा बाजारभाव 4 कोटी प्रति/एकर पेक्षाही जास्त होता. मात्र, त्यावेळी ही जमीन फक्त 100 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आली होती. 

Web Title: Marathi News National News Haryana Bhupinder Hooda Manesar Land