एकाच सूईच्या वापराने 21 जणांना एचआयव्हीची बाधा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

उन्नाव (उत्तर प्रदेश) - येथे गावामध्ये होणाऱ्या मोफत शिबिरामध्ये उपचार घेणे काही लोकांना महागात पडले आहे. अशा शिबिरामध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या गावातील 21 जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डॉक्टरने इंजेक्शन देण्यासाठी एकाच सूईचा अनेकांसाठी वापर केल्याने असे झाल्याचे समोर आले आहे.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.पी. चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगरमऊ तालुक्यातील एचआव्ही बाधितांची संख्या वढल्याचे लक्षात आल्यावर तपासणीसाठी दोन जणांची कमिटी नेमण्यात आली होती. त्यावेळी, जानेवारी महित्यात बांगरमऊ तालुक्यातील काही गावांमध्ये आरोग्य शिबीर घेतले होते. या आरोग्य शिबिरात उपचार झालेल्या काही जणांमध्ये एचआयव्हीचे लक्षण आढळून आले. यासाठी 566 जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 21 जणांना एआयव्हीची बाधा झाल्याचे लक्षात आले. या रुग्णांची चौकशी केली असता त्यातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

दरम्यान, राजेंद्र कुमार नावाच्या व्यक्तिवर यासंबंधी बांगरमऊ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले. राजेंद्र कुमार शेजारच्या एका गावातला रहिवासी आहे.

एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांना कानपूरच्या एआरटी सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे..

Web Title: marathi news national news HIV uttar pradesh