हेरगिरीच्या आरोपावरून हवाई दलाच्या अधिकाऱ्यास अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पाकिस्तानातील इंटर-सर्व्हिस इंटेलिजन्सला (आयएसआय) दिल्याच्या आरोपावरून हवाई दलातील ग्रुप कॅप्टन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संरक्षणविषयक माहिती दिल्याचा आरोपासह हेरगिरी केल्याचा आरोप कॅप्टनवर ठेवण्यात आल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली.

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील संरक्षणविषयक गोपनीय माहिती पाकिस्तानातील इंटर-सर्व्हिस इंटेलिजन्सला (आयएसआय) दिल्याच्या आरोपावरून हवाई दलातील ग्रुप कॅप्टन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संरक्षणविषयक माहिती दिल्याचा आरोपासह हेरगिरी केल्याचा आरोप कॅप्टनवर ठेवण्यात आल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली.

arun marwaha

ग्रुप कॅप्टन अरूण मरवाहा असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव आहे. 31 जानेवारी रोजी हवाई दलाच्या गुप्तचर यंत्रणा विभागाने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या मोबाईल फोनमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळल्याने तपास अधिकाऱ्यांनी त्यांचा मोबाईल फोनही ताब्यात घेतला होता. त्यांना 7 फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले.  

''आम्ही भारतीय हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गोपनीय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्हाला याबाबत काही संशयास्पद संभाषण आणि काही फोटो मिळाले आहेत. सध्या याबाबत तपास सुरु आहे'', अशी माहिती दिल्लीचे विशेष आयुक्त (स्पेशल सेल) एम. एम. ओबेरॉय यांनी दिली. 

Web Title: Marathi News National News IAF Officer Arrested Arun Marvaha