भारत भ्रष्टाचारी देश ; 'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल'चा दावा

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

यापूर्वी 2016 मध्ये भ्रष्टाचाराबाबत भारत 79 व्या क्रमांकावर होता. मात्र, आता यामध्ये वाढ होऊन 81 व्या क्रमांकावर गेला आहे.

नवी दिल्ली : देशात वाढत्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कडक पावले उचलली जात आहेत. मात्र, भारतात भ्रष्टाचार थांबत नसल्याचे एका संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणाऱ्या 'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' या संस्थेनुसार दरवर्षी भारतात भ्रष्टाचार वाढत असल्याचे समोर आले आहे. 

Corruption

यापूर्वी 2016 मध्ये भ्रष्टाचाराबाबत भारत 79 व्या क्रमांकावर होता. मात्र, आता यामध्ये वाढ होऊन 81 व्या क्रमांकावर गेला आहे. तर 2017 मध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने 180 देशांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत 81 व्या क्रमांकावर गेला आहे. मात्र, 2016 मध्ये 176 देशांमध्ये केले गेलेल्या सर्वेक्षणात भारत 79 व्या क्रमांकारवर गेला होता. तसेच 2015 मधील सर्वेक्षणात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात भारत 76 व्या क्रमांकावर गेला होता. 

corruption

दरम्यान, बर्लिन येथील 'करप्शन परसेप्शन इंडेक्स' संस्थेच्या 'ट्रान्सपरन्स इंटरनॅशनल'चा अहवाल दरवर्षी जारी करण्यात येतो. ही संस्था भ्रष्टाचारप्रकरणावर काम करत आहे. या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावरून भ्रष्टाचाराच्या प्रमाणाबाबत माहिती मिळत असते.  

Web Title: Marathi News National News India Corruption Transparency International