उत्तर प्रदेशमध्ये बटाटा उत्पादकांत नाराजी

पीटीआय
सोमवार, 12 जून 2017

अलिगड - बटाटा उत्पादकांना चांगली किमत मिळत नसल्याने आणि हरियानाबरोबरचा शेतजमिनीचा वाद मिटत नसल्यामुळे बटाटा उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे.

गेल्या काही वर्षांपासून ही नाराजी असून अलिगडच्या शेतकऱ्यांच्या मते दोन्ही राज्यात भारतीय जनता पक्षाचे आणि केंद्रात एनडीएचे सरकार असूनही अद्यापही हा प्रश्‍न सुटलेला नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्याच्या तपलसह दोन विविध भागांत शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याचे वृत्त आहे.

भारतीय किसान संघटनेचे अध्यक्षांनी सांगितले की, गोंडा विभागात संघटनेने ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे. हरियानाबरोबरचा जमिनीचा वाद मिटवावा, बटाट्याचा खरेदी दर ठरवावा आणि मध्य प्रदेशमध्ये गोळीबारात शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांना अटक करावी या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. 

Web Title: marathi news national news india news potato producer