पाकिस्तानसोबत एकदा युद्ध व्हायला हवे : रामदास आठवले

वृत्तसंस्था
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

"'पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. एकदा तरी पाकिस्तानसोबत युद्ध व्हायला हवे''.  

- रामदास आठवले

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. त्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केले. ते म्हणाले, "'पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. एकदा तरी पाकिस्तानसोबत युद्ध व्हायला हवे''.  

ramdas athawale

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानच्या सैन्याकडून पूँच आणि राजौरी येथे करण्यात आलेल्या गोळीबारात चार जवान हुतात्मा झाले होते. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यावर आठवले म्हणाले, की ''पाकिस्तानसोबत आरपारची लढाई व्हायला हवी. पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. आम्ही मैत्री करण्यास इच्छुक आहोत. भारताच्या ताकदीसमोर पाकिस्तान खूपच खुजा आहे''.

Web Title: Marathi News National News India Pakistan War Ramdas Athawale