इंजिनात बिघाड झाल्याने इंडिगोची 47 विमाने रद्द

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 मार्च 2018

इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्याने दिल्ली-मुंबई या विमानप्रवासाचे भाडे 15 हजार रूपयांपेक्षा जास्त वाढविण्यात आले आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

नवी दिल्ली : इंडिगोची तब्बल 47 विमानांची उड्डाणे आज (मंगळवारी) रद्द करण्यात आली आहे. विमानांच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे इंडिगोची विविध मार्गावरील विमान उड्डाणे रद्द केली गेली. याबाबत नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) सदोष इंजिन असल्याने ही विमाने रद्द करण्यात आल्याचे सांगितले.

IndiGo

सोमवारी अहमदाबाद ते कोलकाता व्हाया लखनौ जाणाऱ्या इंडिगो 6 ई-244 या विमानाच्या इंजिनामध्ये हवेतमध्ये असताना खराबी आले आणि इंजिन सदोष झाले. त्यामुळे विमानाचे आपातकालीन लँडिंग करावे लागले. यानंतर नागरी उड्डाण महासंचलनालयाने एका खास 'प्रॅट आणि व्हिटनी' इंजिनच्या 11 ए 320 निओ या विमानांची उड्डाणे तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 47 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 

Airport

दरम्यान, इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्याने दिल्ली-मुंबई या विमानप्रवासाचे भाडे 15 हजार रूपयांपेक्षा जास्त वाढविण्यात आले आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

  

Web Title: Marathi News National News Indigo Airlines 47 Flights Cancelled