इराकच्या घटनेची माहिती देण्यास उशीर का : शशी थरूर

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

''देशातील प्रत्येक नागरिकांसाठी ही घटना अत्यंत दु:खद आहे. पण केंद्र सरकारने ही माहिती देण्यास इतका उशीर का केला''.

- शशी थरूर, काँग्रेस नेते

नवी दिल्ली : इराकमध्ये अपहरण करण्यात आलेल्या 39 भारतीयांची हत्या करण्यात आल्याची माहिती आज (मंगळवार) परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत दिली. देशातील प्रत्येक नागरिकांसाठी ही घटना अत्यंत दु:खद आहे. पण केंद्र सरकारने ही माहिती देण्यास इतका उशीर का केला, असा सवाल काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला. 

sushma swaraj in parliament

इराकमधील अपहृत 40 पैकी 39 भारतीयांची इसिसने 2014 मध्ये हत्या केल्याची माहिती आज सुषमा स्वराज यांनी दिली. त्यानंतर थरूर यांनी याबाबत केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. इराकची ही घटना देशातील प्रत्येकासाठी अत्यंत दु:खद आहे. पण सरकारने ही माहिती देण्यास इतका उशीर का केला. तसेच या सर्वांचा 2014 मध्ये मृत्यू झाल्याचे माहीत असतानाही केंद्र सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना याबाबतची कोणतीही माहिती का दिलेली नाही. संबंधितांच्या कुटुंबीयांना विनाकारण आशा का लावली, अशा शब्दांत शशी थरूर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.   

Web Title: Marathi News National News Iraq News Incident why government late to inform says Congress Shashi Tharoor