लैंगिक शोषणप्रकरणी 'जेएनयू'च्या प्राध्यापकाला अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

अतुल जोहरी हा जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे. विद्यापीठातील काही विद्यार्थिनींनी जोहरीविरोधात लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. या आरोपावरून जोहरीविरोधात वसंत कुंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) प्राध्यापक अतुल जोहरीला लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली. विद्यापीठातील विद्यार्थिनींनी केलेल्या आरोपावरून जोहरीला अटक केली. याप्रकरणी जोहरी यास पतियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

अतुल जोहरी हा जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे. विद्यापीठातील काही विद्यार्थिनींनी जोहरीविरोधात लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. या आरोपावरून जोहरीविरोधात वसंत कुंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जोहरी हा सर्वच विद्यार्थिनींबाबत अश्लिल भाषेत बोलत असे. तसेच तो विद्यार्थिनींना उघडपणे सेक्ससाठी विचारणा करत असे. याशिवाय अनेक विद्यार्थिनींच्या अंगाकडे पाहून अश्लिल टिप्पणीही करत असे. जर कोणत्याही विद्यार्थिनीने याविरोधात काय बोलले तर तो त्यांच्याविरोधात द्वेष करत असे, असे पीडित विद्यार्थिनीने सांगितले.  

दरम्यान, चार दिवसानंतर यातील आठ विद्यार्थिनींनी लैंगिक शोषण केल्याची तक्रार संबंधित प्राध्यापकाविरोधात केली. त्यानंतर त्या प्राध्यापकाविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष सिमोन झोया खान यांनी सांगितले.   

Web Title: Marathi News National News JNU professor Atul Johri arrested in sexual harassment case