न्या. लोया मृत्यूप्रकरणी विरोधकांची 'एसआयटी'ची मागणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

''114 खासदारांनी स्वाक्षरी केलेले पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. या पत्रात न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशी विनंती करण्यात आली''.

- राहूल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. या सर्व खासदारांनी याबाबतचे पत्र राष्ट्रपतींना दिले.  

rahul gandhi

न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाची चौकशी केली जावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी मागणी केली होती. तसेच सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता या मृत्यूप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) यांच्यासह इतर 13 पक्षांच्या खासदारांनी केली. 

Rashtrapati bhavan

''114 खासदारांनी स्वाक्षरी केलेले पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. या पत्रात न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशी विनंती करण्यात आली'', असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  

 

Web Title: Marathi News National news Justice Loya SIT Probe Rahul Gandhi