कार्ती चिदंबरम यांच्याविरोधातील 'लूक आऊट नोटीस'वर निर्णय घ्या : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जानेवारी 2018

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना यापूर्वी 'लूक आऊट नोटीस' बजावण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांच्या लूक आऊट नोटीसबाबत दोन महिन्यात निर्णय घ्या, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाला दिले आहेत. 

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 'लूक आऊट नोटीस' बजावण्यात आली असून, या नोटीसवर दोन महिन्यांत निर्णय घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाला दिले आहेत.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना यापूर्वी 'लूक आऊट नोटीस' बजावण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांच्या लूक आऊट नोटीसबाबत दोन महिन्यात निर्णय घ्या, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाला दिले आहेत. 

दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कार्ती यांच्यासह आयएनएक्‍स मीडियावर एफआयआर दाखल केला होता.

Web Title: Marathi news National News Karti Chidambaram Look Out Notice