काश्मीर: हिमस्खलनात 3 जवान हुतात्मा, 1 जखमी

वृत्तसंस्था
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

कुपवाडा -  लष्कराच्या कुपवाड्यातील मछिल सेक्टरमधील चौकीला हिमस्खलनाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये भारतीय लष्कराचे तीन जवान हुतात्मा झाले असून, एक जखमी झाल्याचे वृत्त आहे. हिमस्खलनामुळे चौकी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

दुर्घटनेत हवालदार कमलेश सिंह, नायक बलवीर आणि शिपाई राजिंदर हे तीन जवान हुतात्मा झाले आहेत. तर जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीनंतर हवामान विभागाने हिमस्खलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर कुपवाड्यात तैनात असलेल्या सर्व जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

दरम्यान, गेल्या महिन्यात कुपवाड्यात हिमस्खलनात 11 जणांचा मृत्यू झाला होता.

Web Title: marathi news national news kashmir Soldiers Avalanche Hits Army Camp