चारा घोटाळाप्रकरणी लालूंना उद्या शिक्षा सुनावली जाणार

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जानेवारी 2018

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले. त्यानंतर आज त्यांच्या शिक्षेच्या सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने उद्या (गुरुवार) शिक्षा सुनावली जाणार आहे.

नवी दिल्ली : चारा घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने 23 डिसेंबरला बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले. त्यानंतर आज त्यांच्या शिक्षेच्या सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने उद्या (गुरुवार) शिक्षा सुनावली जाणार आहे.

कोट्यवधींचा चारा घोटाळा केल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांच्यासह 22 जणांवर ठेवण्यात आला होता. मात्र, शिवपाल सिंग यांच्या न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जणांना दोषी ठरवले आहे. तर जगन्नाथ मिश्रा यांच्यासह अन्य 7 जणांची निर्दोष मुक्तता केली.

आज त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र, वकील विंदेश्वरी प्रसाद यांचे निधन झाल्याने त्यांच्या शिक्षेस सुनावणी उद्या करण्यात येणार आहे. 

दरम्यान, लालूप्रसाद यादव हे सध्या 70 वर्षांचे असल्याने ते विविध आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना कमीत कमी शिक्षा व्हावी, अशी विनंती लालूंच्या वकिलांनी न्यायालयात केली. त्यावर न्यायालय काय शिक्षा सुनावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: marathi news national news Lalu Prasad Yadav sentencing in fodder scam case postponed till tomorrow