...म्हणून लॅमिनेटेड 'आधार' नको : यूआयडी

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक केले जात आहे. मात्र, आधारकार्ड जर लॅमिनेटेड असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कागदावर छापण्यात आलेलेच आधारकार्ड योग्य आहे, लॅमिनेशन केलेले किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधारकार्डचा क्यू आर कोड स्कॅन करण्यास अडचणी येऊ शकतात.

नवी दिल्ली : लॅमिनेटेड आधारकार्ड असल्यास ते आता काही कामाचे नसणार आहे. लॅमिनेशन केल्याने किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधारकार्डचा क्यू आर कोड स्कॅन करताना अडचणी येऊ शकतात. परिणामी संबंधित आधारकार्डधारकाची माहिती मिळण्याची शक्यता कमी असते, ही शक्यता लक्षात घेता यापुढे लॅमिनेटेड आधारकार्ड बिनकामाचे ठरणार असल्याचे स्पष्टीकरण यूआयडीएने दिले आहे.

aadhar card

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक केले जात आहे. मात्र, आधारकार्ड जर लॅमिनेटेड असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कागदावर छापण्यात आलेलेच आधारकार्ड योग्य आहे, लॅमिनेशन केलेले किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधारकार्डचा क्यू आर कोड स्कॅन करण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आधारकार्डधारकाची माहिती मिळण्यास अडचणी येऊ शकतात, प्लास्टिक कोटेड आधारकार्ड करून काही रकमाही दिल्या जात असल्याचे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले.

   

Web Title: Marathi News National News Laminated AADHAR UIDAI