भुकेने व्याकूळ होऊन एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

नेमचंद्र श्रीवास्तव या 47 वर्षीय व्यक्तीचा भुकेने व्याकूळ होऊन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये घडली.

बरेली : केंद्र सरकारकडून देशातील गरिब व गरजूंसाठी विविध योजना आणल्या जात आहेत. तसेच गरिबांसाठी स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठाही केला जात आहे. मात्र, एका 47 वर्षीय व्यक्तीचा भुकेने व्याकूळ होऊन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये घडली.

नेमचंद्र श्रीवास्तव असे मृत इसमाचे नाव असून, ते बरेलीतील कुंदरिया गावात वृद्ध मातेसह एका छोट्याशा खोलीत राहत असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती उप-विभागीय अधिकारी ममता मालविय यांनी दिली. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी केलेला आरोप फेटाळून लावत हा मृत्यू भुकेने नाहीतर थंड हवामानामुळे झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.  

नेमचंद्र अर्धवेळ न्हावी म्हणून काम करत होते. ते अविवाहित आहेत. तसेच त्यांची आई अंत्योदय कार्डधारक असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: marathi news national news Man dies of hunger in Kundariya village of Bareilly