मेघालयात आढळली जगातील सर्वात मोठ्या लांबीचा गुहा

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

जगातील सर्वात मोठ्या लांबी असणारी खडकाची गुहा मेघालयात आढळली आहे. या गुहेची लांबी तब्बल 24,583 मीटर असून, ही गुहा जगातील सर्वात मोठ्या लांबीची गुहा ठरली आहे.

शिलाँग : जगातील सर्वात मोठ्या लांबी असणारी खडकाची गुहा मेघालयात आढळली आहे. या गुहेची लांबी तब्बल 24,583 मीटर असून, ही गुहा जगातील सर्वात मोठ्या लांबीची गुहा ठरली आहे. यापूर्वी 18,200 मीटर इतकी लांबी असणारी गुहेची नोंद करण्यात आली. मात्र, आता ही नवी गुहा सापडली आहे.

Meghalaya longest Caves

जगातील सर्वात मोठ्या लांबीची ही गुहेला 'क्रेम पुरी' असे नाव देण्यात आले आहे. ही गुहा 2016 साली शोधण्यात आली असून, या गुहेची लांबी 'मेघालय अॅडव्हेंचर असोसिएशन'ने (एमएए) मोजमाप केल्यानंतर समोर आली. या गुहेची लांबी 5 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीमध्ये मोजण्यात आली, अशी माहिती संस्थेचे सदस्य ब्रियन दाली खारप्राण यांनी दिली. ही गुहा जमीनखालील 6000 मीटरपेक्षा मोठी असून, याने जागतिक विक्रम केला आहे. यापूर्वी वेनेझुएलातील एडू झुलिया येथील 'क्युवा डेल समन' ही गुहा सर्वात मोठ्या लांबीची गुहा म्हणून प्रसिद्ध होती. या गुहेची लांबी 18,200 मीटर इतकी आहे. मात्र, आता या गुहेचा विक्रम मोडीत निघाला आहे. 

Image result for Meghalaya Caves

'क्रेम पुरी'नंतर सामान्य प्रणालीत क्रेम लिएट प्राह-उमिम-लबित प्रणालीतील भारताची दुसरी सर्वात मोठी गुहा ठरली आहे. मेघालयातील 31 किमी लांबीचे मोजमाप केल्यानंतर ही सर्वात लांब असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे 'तेंझिंग नॉरगे नॅशनल अॅडव्हेंचर अॅवॉर्ड 2002' पुरस्कारविजेते खारप्राण यांनी सांगितले. 

Web Title: Marathi News National News Meghalaya News At over 24000 metres in length worlds longest sandstone cave found