पाकिस्तानशी युद्ध नको, चर्चा हवी : मेहबूबा मुफ्ती

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

''माझ्या या वक्तव्यावरून मला राष्ट्रविरोधी असल्याचे वृत्तनिवेदकांकडून संबोधले जाईल, हे मला माहिती आहे. पण मला काहीही फरक पडत नाही. जम्मू-काश्मीरच्या जनता यातून जात आहे. मी आज हे बोलण्याचे कारण म्हणजे फक्त युद्ध हा पर्याय नाही. पाकिस्तानसोबत चर्चा आवश्यक आहे''.  

- मेहबूबा मुफ्ती, मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

जम्मू : गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतर अनेकदा पाकिस्तानशी युद्ध करण्याची भाषा केली जात आहे. मात्र, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी याबाबत वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, ''जर राज्यात रक्तपात संपवायचा असेल तर पाकिस्तानसोबत युद्ध नको, चर्चा आवश्यक आहे''. 

mehbooba mufti

पाकिस्तानकडून करण्यात येत असलेले दहशतवादी हल्ल्यांना लगाम लावण्यासाठी पाकिस्तानसोबत युद्ध केले जावे, अशी वक्तव्ये अनेकांनी केली होती. त्यानंतर मुफ्ती म्हणाल्या, ''माझ्या या वक्तव्यावरून मला राष्ट्रविरोधी असल्याचे वृत्तनिवेदकांकडून संबोधले जाईल, हे मला माहिती आहे. पण मला काहीही फरक पडत नाही. जम्मू-काश्मीरच्या जनता यातून जात आहे. मी आज हे बोलण्याचे कारण म्हणजे फक्त युद्ध हा पर्याय नाही. पाकिस्तानसोबत चर्चा आवश्यक आहे''.  

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुफ्ती बोलत होत्या. 

Web Title: Marathi News National News Mehbooba Mufti War Discussion Pakistan Attack