जया बच्चन ठरणार सर्वात श्रीमंत खासदार

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 मार्च 2018

भाजपचे राज्यसभेतील खासदार रविंद्र किशोर सिन्हा हे यापूर्वी सर्वात श्रीमंत खासदार म्हणून ओळखले जात असे. सिन्हा यांची संपत्ती आठशे कोटी रुपयांपर्यंत गेली होती. त्यानंतर आता जया बच्चन यांची संपत्ती तब्बल एक हजार कोटींहून अधिक असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना समाजवादी पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी नुकतीच देण्यात आली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीनुसार त्या सर्वात श्रीमंत खासदार ठरणार आहेत. जया बच्चन यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. 

jaya bachchan

भाजपचे राज्यसभेतील खासदार रविंद्र किशोर सिन्हा हे यापूर्वी सर्वात श्रीमंत खासदार म्हणून ओळखले जात असे. सिन्हा यांची संपत्ती आठशे कोटी रुपयांपर्यंत गेली होती. त्यानंतर आता जया बच्चन यांची संपत्ती तब्बल एक हजार कोटींहून अधिक असल्याचे समोर आले आहे. जया बच्चन यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज शुक्रवारी भरला. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दिले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीची माहिती जाहीर केली. 

Parliament

२०१२ मध्ये जया बच्चन यांची संपत्ती ४९३ कोटी रुपये इतकी होती. मात्र, आता यामध्ये वाढ होऊन त्यांची संपत्ती एक हजार कोटींहून अधिक झाली आहे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या नावे ४६० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून, ५४० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच बच्चन दाम्पत्याकडे सोने, चांदी, हिरे असे एकूण ६२ कोटी रुपयांचे दागिने आहेत. यामध्ये जया बच्चन यांच्याकडील २६ कोटींच्या दागिन्यांचा समावेश आहे.

Web Title: Marathi News National News MP Jaya Bachchan could be Richest MP