नीरव मोदी अमेरिकेत आहे? आम्हाला माहिती नाही..!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 मार्च 2018

नीरव मोदी आणि त्याचा चुलता मेहुल चोक्सी या दोघांवर तपास यंत्रणेने ठेवलेल्या आरोपांवर चौकशी करत आहे. या दोघांवर मुंबई येथील पंजाब नॅशनल बँकेच्या विविध शाखांमध्ये तब्बल 12,000 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हा गैरव्यवहार उघडकीस येताच नीरव मोदीने परदेशात पलायन केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर यावर अमेरिकेने स्पष्टीकरण दिले. 

वॉशिंग्टन : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहारप्रकरण समोर आल्यानंतर हिरे व्यावसायिक नीरव मोदीने भारतातून पलायन केल्याचे सांगण्यात आले. नीरव मोदीने भारतातून पलायन करून अमेरिकेत गेला असे सांगितले जात असताना मात्र, आता अमेरिकेने याबाबत स्पष्टीकरण दिले. नीरव मोदी अमेरिकेत असल्याच्या अहवालात कोणतेही तथ्य नाही. हा अहवाल अस्पष्ट आहे. नीरव मोदी अमेरिकेत आहे? याबाबत आम्हाला माहिती नाही, असे सांगितले.

PNB

नीरव मोदी आणि त्याचा चुलता मेहुल चोक्सी या दोघांवर तपास यंत्रणेने ठेवलेल्या आरोपांवर चौकशी करत आहे. या दोघांवर मुंबई येथील पंजाब नॅशनल बँकेच्या विविध शाखांमध्ये तब्बल 12,000 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हा गैरव्यवहार उघडकीस येताच नीरव मोदीने परदेशात पलायन केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर यावर अमेरिकेने स्पष्टीकरण दिले. 

''माध्यमांनी दिलेल्या अहवालानंतर आम्ही याबाबत सावधगिरी बाळगून आहोत. आम्हाला समजले, की नीरव मोदी भारतातून पलायन करून अमेरिकेत आल्याचा अहवाल जारी करण्यात आला. मात्र, याबाबत कोणतेही तथ्य नाही. हा अहवाल अस्पष्ट आहे. तसेच जेव्हा या अहवालाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा भारतीय उद्योजक न्यूयॉर्कमध्ये असल्याचे येथील प्रवक्त्यांनी सांगितले''.

Web Title: Marathi News National News Nirav Modi Case PNB Scam US won not confirm reports of Nirav Modi being in the country