ऑनलाइन व्यवहारांच्या तब्बल 22 हजारांहून अधिक तक्रारी

वृत्तसंस्था
शनिवार, 30 डिसेंबर 2017

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि विविध मंत्रालये आणि विभागांकडून याबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यांच्या सुचनेनंतर यावर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.

(रविशंकर प्रसाद, माहिती आणि  तंत्रज्ञानमंत्री )

नवी दिल्ली : सध्या देशभरात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना आणल्या जात आहेत. मात्र, डिजिटल व्यवहार करताना अनेक धोकेही असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने जानेवारी 2017 ते डिसेंबर 2017 अखेरपर्यंत तब्बल 22,700 फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्याची माहिती जाहीर केली आहे.

ऑनलाइन व्यवहार करताना सुरक्षेच्या दृष्टीने विशेष अशी खबरदारी घेण्याचे आवाहन विविध बँकांकडून वेळोवेळी केले जाते. मात्र, ऑनलाइन व्यवहार करताना अनेकदा फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली. ऑनलाइन व्यवहार करताना तब्बल 22,700 फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्याची माहिती माहिती आणि  तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

1 जानेवारी, 2017 ते 21 डिसेंबर, 2017 या कालावधीत 22,700 हून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून, यामध्ये 155 कोटींचा अपहार झाला असल्याची बाब उघडकीस आली.  

''रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि विविध मंत्रालये आणि विभागांकडून याबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यांच्या सुचनेनंतर यावर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील'', अशी माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली.

Web Title: marathi news national news Over 22700 online transaction fraud cases reported in India till December Govt