अर्थव्यवस्थेची स्थिती सरकार नाकारतेय ; चिदंबरम यांची टीका

वृत्तसंस्था
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

मुख्य आर्थिक सल्लागार हे निवासी डॉक्‍टर असून, ते रोजच्या रोज रुग्णाची प्रकृती तपासतात. रुग्ण आजारी असल्यास त्याचे निदान करून औषधे सुचवतात. परंतु, सरकार असे रुग्ण आहे, की ते औषधे न स्वीकारता स्वत:च निदान करून स्वत:वर उपचार करीत आहे. 
- पी. चिदंबरम, ज्येष्ठ काँग्रेस नेते 

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार अर्थव्यवस्थेची खराब स्थिती नाकारत आहे, अशी टीका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी केली. अत्यवस्थ रुग्णाने स्वत:च निदान करण्याचा हा प्रकार असल्याचा टोला त्यांनी लगावला. 

chidambaram

माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम म्हणाले, की मुख्य आर्थिक सल्लागारपदी 2014 मध्ये नियुक्ती झाल्यापासून अरविंद सुब्रह्मण्यम हे चांगले डॉक्‍टर ठरले आहेत. असे असूनही सरकार त्यांच्या सल्ला स्वीकारत नाही. एनडीए सरकार हे अत्यवस्थ रुग्णासारखे आहे. सरकार खराब आर्थिक स्थिती कायम नाकारत आहे. अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती सरकार स्वीकारत नसल्याचेच चित्र दिसते.

finance

कृषी क्षेत्रातील असंतोष, बेरोजगारी, विरोधकांचे म्हणचे या सर्व बाबी नाकारण्याचे काम सरकार करीत आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनीच नेमलेल्या डॉक्‍टरांनी केलेले निदान आणि औषधेही सरकारला नको आहेत. 

Web Title: Marathi News National News P chidambaram Economic Condition