पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन ; पूंच येथील सीमारेषेवर गोळीबार

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जानेवारी 2018

पाकिस्तानकडून छोटी शस्त्रास्त्रे, स्वयंचलित शस्त्रांसह सीमारेषेवर गोळीबार करण्यात आला. या भागात सलग दोन तास गोळीबार सुरु होता. यापूर्वीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यादरम्यान पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या गोळीबारात परिसरातील काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले.   

जम्मू : पाकिस्तानी सैन्याकडून पूंच जिल्ह्यातील सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार करण्यात आला.

पाकिस्तानकडून छोटी शस्त्रास्त्रे, स्वयंचलित शस्त्रांसह सीमारेषेवर गोळीबार करण्यात आला. या भागात सलग दोन तास गोळीबार सुरु होता. यापूर्वीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यादरम्यान पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या गोळीबारात परिसरातील काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले.   

दरम्यान,  पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. तसेच यापूर्वी पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय लष्करातील जवान मनदीप सिंग यांना वीरमरण आले होते. 

Web Title: Marathi News National news Pakistan Ceasefire pooch district