पंचकुला हिंसाप्रकरण ; 11 जानेवारीपासून चालणार हनीप्रीतवर खटला

haniprit
haniprit

नवी दिल्ली : पंचकुला हिंसाचारप्रकरणी हनीप्रीतसह इतर 14 जणांवर 25 ऑगस्ट रोजी खटला दाखल झाला. आता या हिंसाचारप्रकरणाचा खटला 11 जानेवारीपासून न्यायालयात चालवला जाणार आहे. हिंसाचारप्रकरणाचा खटला अतिरिक्त सत्र न्यायालयात चालवला जाणार आहे. 

हनीप्रीतसह यातील सर्व आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर गुरुवारी हजर केले होते. न्यायालयाने या सर्वांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश निरजा कुलवंत कल्सन यांच्या न्यायालयाकडे पाठवण्यात आले आहे.   

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिम याला 25 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात आली. त्याला शिक्षा सुनावल्यानंतर राज्यभरभरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार माजवण्यात आला होता. हा हिंसाचार पैसे देऊन बाबा राम रहिमची दत्तक कन्या हनीप्रीतने केल्याचे समोर आले होते. त्यानंतर हनीप्रीतवर 25 ऑगस्ट रोजी गुन्हेगारी कट रचणे, देशद्रोह आणि पंचकुलामध्ये हिंसा भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

हिंसाचारप्रकरणी 15 आरोपींपैकी खैराती लाल आणि गोविंद इन्सान या दोघा आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच इतर आरोपी चमकौर सिंग आणि सुरेंद्र धिमन यांना जामीन नाकारण्यात आला.

दरम्यान, आता याप्रकरणाची सुनावणी 11 जानेवारीला होणार असल्याने न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com