आता पासपोर्टमध्ये होणार 'हा' बदल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पासपोर्टच्या नव्या सीरिजमध्ये हा नवा बदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पासपोर्ट दिला जाणार आहे. पासपोर्टचे शेवटचे पान रिकामे ठेवण्याचा सध्या विचार आहे. तसेच पासपोर्टच्या रंगामध्येही बदल केला जाणार आहे. 

नवी दिल्ली : भारत सरकारकडून दिला जाणारा पासपोर्ट आता पत्त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. कारण पासपोर्टची नवी सीरिज लवकरच येणार आहे. या नव्या सीरिजनुसार शेवटचे पान रिकामे असणार आहे. त्यामुळे पासपोर्टवर पत्ता दिसणार नाही.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पासपोर्ट हा पत्त्याचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात आहे. सध्या पासपोर्टच्या शेवटच्या पानावर संबंधित पासपोर्टधारकाचा पत्ता छापला जात आहे. मात्र, या नव्या सीरिजमध्ये शेवटचे पान रिकामे दिले जाणार आहे. त्या पानावार कोणतीही छपाई केली जाणार नाही. पत्ता नसल्याने यापुढे पासपोर्ट पत्त्याचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. 

पासपोर्टच्या नव्या सीरिजमध्ये हा नवा बदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पासपोर्ट दिला जाणार आहे. पासपोर्टचे शेवटचे पान रिकामे ठेवण्याचा सध्या विचार आहे. तसेच पासपोर्टच्या रंगामध्येही बदल केला जाणार आहे. 

''पासपोर्टमध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे'', असे पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी जे. डी. वैशंपायन यांनी सांगितले.

सध्या पासपोर्टच्या पहिल्या पानावर पासपोर्टधारकाच्या छायाचित्रासह काही महत्वाची माहिती दिली जाते. त्यानंतर पासपोर्टच्या शेवटच्या पानावर संबंधिताचा पत्ता छापला जातो.  

पासपोर्टच्या शेवटच्या पानावर बारकोड देण्यात येणार आहे. या बारकोडला स्कॅनिंग केल्यानंतर संबंधितांची सगळी माहिती मिळू शकेल.

दरम्यान, नवीन सीरिजचे पासपोर्ट असले तरीदेखील जुन्या सीरिजचे पासपोर्ट वैधतेपर्यंत चालणार आहे, अशी माहिती देण्यात येत आहे. 

Web Title: Marathi news national news Passports may no longer be valid proof of address