पेट्रोलच्या दरात वाढ ; डिझेलच्या किमतीत बदल नाही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

या अर्थसंकल्पात पेट्रोलच्या दराच प्रति/लिटर 5 पैशांनी वाढ झाली आहे. ही नवी दरवाढ दिल्ली, कोलकाता, चैनई आणि मुंबई येथे लागू करण्यात आली.

नवी दिल्ली : 2018-19 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात पेट्रोलच्या दराच प्रति/लिटर 5 पैशांनी वाढ झाली आहे. ही नवी दरवाढ दिल्ली, कोलकाता, चैनई आणि मुंबई येथे लागू करण्यात आली. मात्र, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

petrol pump

अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कोणतीही कपात न करता दर वाढविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. ही नवी दरवाढ आज सकाळी सहावाजेपासून लागू करण्यात आली आहे. या नव्या दरवाढीनुसार राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 73.1 रूपये प्रति/लिटर, कोलकाता येथे 75.79 रुपये प्रति/लिटर, मुंबईत 80.96 रुपये प्रति/लिटर तर चेनईत 75.82 रुपये प्रति/लिटर असणार आहे.

Web Title: Marathi News National News Petrol Prices Hiked Diesel Prices Unchanged