मुली कु़टुंबाची आन, बान, शान : पंतप्रधान

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 मार्च 2018

''मुली कुटुंबाचे ओझे नाही. तर त्या संपूर्ण कुटुंबाची आन, बान आणि शान आहेत. मुली आपल्या देशाला गौरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत''.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

झुनझुनू : ''मुली कुटुंबाचे ओझे नाही. तर त्या संपूर्ण कुटुंबाची आन, बान आणि शान आहेत. मुली आपल्या देशाला गौरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत'', असे गौरद्वागार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) येथे काढले. तसेच मुली आणि मुलांमधील होत असलेला भेदभाव दूर करण्यासाठी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हे अभियान राबविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. 

Narendra modi

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राजस्थानातील झुंझुनूं येथे राष्ट्रीय पोषण आहार मिशनची सुरवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री मेनका गांधी आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे उपस्थित होत्या. या आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, ''सध्या मुली विविध क्षेत्रांमध्ये देशाचे गौरव करत आहेत. त्यामुळे समाजात मुलींबाबत असलेली विचारसरणी बदलण्याची आता गरज आहे.

मुलगा-मुलगी यातील भेदभाव रोखण्यासाठी सामाजिक आणि जन आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. यासाठी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हे अभियान राबविण्याची गरज आहे. या अभियानासाठी आपण सर्वांनी मिळून सामाजिक आंदोलन उभे करायला हवे''. 

Web Title: Marathi News National News PM Modi Address for Women Day