70 वर्षांच्या पापाची शिक्षा देशाला भोगावी लागतेय : पंतप्रधान

वृत्तसंस्था
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

"मागील सरकारने देशाचे तुकडे केले. काँग्रेसच्या 70 वर्षांच्या पापाची शिक्षा आज देशाला भोगावी लागत आहे''.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा सन्मान झालाच पाहिजे. मागील सरकारने देशाचे तुकडे केले. काँग्रेसच्या 70 वर्षांच्या पापाची शिक्षा आज देशाला भोगावी लागत आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.

संसदेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्ष फक्त नावाला होते. तत्कालीन मीडियाही सरकारच्या म्हणण्यानुसार वागत होती. त्यावेळी न्यायालायतही काँग्रेसकडून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. त्यावेळी त्यांना कोणीही विरोध करत नव्हते. पंचायतपासून ते संसदेत काँग्रेसचाच आवाज होता. रेडिओही काँग्रेसचे होते. 

त्यावेळी फक्त एकाच कुटुंबाचे गुणगान गाण्यात येत असायचे. काँग्रेसने जबाबदारीने काम केले असते तर देश पुढे गेला असता. काँग्रेसमुळे देशाचा विकास झाला नाही.

दरम्यान, मोदींच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी करण्यात येत होती. विरोधकांकडून 15 लाखांचे काय झाले काय झाले, असे विचारले जात आहे. याशिवाय तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: Marathi News National news PM Narendra Modi Criticizes Congress