'पीएनबी'तील आणखी एक गैरव्यवहार उघडकीस

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेत 11,300 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आता हा नवा 1322 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या नव्या गैरव्यवहारामुळे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या गैरव्यवहाराच्या रकमेत वाढ होऊन हा आकडा आता १२६०० कोटी रूपयांवर गेला आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) उद्योजक नीरव मोदीचा तब्बल १३२२ कोटींचा आणखी एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. 'पीएनबी'ने स्टॉक एक्सचेंजला नीरव मोदी आणि त्याचा व्यावसायिक भागीदार मेहुल चोक्सी यांनी १३२२ कोटी रूपयांचा आणखी एक मोठा गैरव्यवहार केल्याची माहिती दिली. 

PNB

पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेत 11,300 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आता हा नवा 1322 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या नव्या गैरव्यवहारामुळे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या गैरव्यवहाराच्या रकमेत वाढ होऊन हा आकडा आता १२६०० कोटी रूपयांवर गेला आहे.

Indian Cash

दरम्यान, बँकेच्या ओव्हरसीज शाखेला मिळालेल्या नव्या 'लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज'नंतर हा नवा घोटाळा समोर आला आहे. पीएनबीने स्टॉक एक्सचेंजला नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी 1300 कोटी रूपयांचा आणखी एक घोटाळा केल्याची माहिती दिली.

Web Title: Marathi News National News PNB New Scam 1322 Crores