पीएनबी गैरव्यवहार ; आयसीआयसीआय, अॅक्सिसच्या अधिकाऱ्यांना समन्स़

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

आयसीआयसीआयने गीतांजली ग्रुपला ४०५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. अॅक्सिस बँकेनेही या समूहाला मोठ्या रकमेचे कर्ज दिले होते. याप्रकरणात कोचर आणि शर्मा यांची चौकशी होऊ शकते, असे सांगण्यात आले. 

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी 'सीरिअस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस'ने (एसएफआयओ) अॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा आणि आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांना समन्स बजावले आहे. शर्मा आणि कोचर यांना नोटीस बजावण्यात आली असून, गीतांजली ग्रुपला 'वर्किंग कॅपिटल फॅसिलिटी' देण्यासंदर्भात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. 

Chanda kochhar

मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या विविध शाखांमध्ये एकूण सुमारे 12,600 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी यांच्या गीतांजली ग्रुपला ३१ बँकांनी ५,२८० कोटी रुपयांची 'वर्किंग कॅपिटल फॅसिलिटी' दिली होती. याआधी एसएफआयओने पंजाब नॅशनल बँकेला नोटीस बजावली होती. त्यानंतर आता इतर बँकांनाही यासंदर्भात नोटीस बजावून याबाबत उत्तर मागितले आहे. 

Shikha sharma

आयसीआयसीआयने गीतांजली ग्रुपला ४०५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. अॅक्सिस बँकेनेही या समूहाला मोठ्या रकमेचे कर्ज दिले होते. याप्रकरणात कोचर आणि शर्मा यांची चौकशी होऊ शकते, असे सांगण्यात आले. 

दरम्यान, पीएनबी गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (मंगळवार) गीतांजली समूहाचा उपाध्यक्ष विपुल चितळीया याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता शर्मा आणि कोचर यांना समन्स बजावण्यात आले आहे. 

Web Title: Marathi News National News PNB Scam ICICI Axis Bank Chanda Kochar and Shikha Sharma Summons