मी काही चुकीचे केले नाही : मेहुल चोक्सी

वृत्तसंस्था
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

''माझ्या नशिबात ज्या गोष्टी असतील तर त्यास मी सामोरे जाण्यास तयार आहे. मी काहीही चुकीचे केले नाही, हे मला माहिती आहे. मात्र, जगासमोर लवकरच सत्य समोर येईल. मी सध्या असंख्य अडचणींना सामोरे जात आहे. तपास यंत्रणा आणि सरकारी यंत्रणा यांनी हातमिळवणी केली. त्यामुळे मला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले आहे''.

- मेहुल चोक्सी, मालक, गितांजली जेम्सचे

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहारप्रकरणात उद्योजक नीरव मोदीसह गितांजली जेम्सचे मालक मेहुल चोक्सी यांच्यावर आरोप आहेत. या आरोपांवरून त्यांच्या व्यवसायावर परिणाम होताना दिसत आहे. त्यानंतर आता चोक्सी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहून याबाबत स्पष्टीकरण दिले. ''मी कोणतेही चुकीचे काम केले नसून, सत्य लवकरच जगासमोर येईल.''

mehul choksi

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत तब्बल 11,300 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर चोक्सी यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहिले. ''माझ्या नशिबात ज्या गोष्टी असतील तर त्यास मी सामोरे जाण्यास तयार आहे. मी काहीही चुकीचे केले नाही, हे मला माहिती आहे. मात्र, जगासमोर लवकरच सत्य समोर येईल. मी सध्या असंख्य अडचणींना सामोरे जात आहे. तपास यंत्रणा आणि सरकारी यंत्रणा यांनी हातमिळवणी केली. त्यामुळे मला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले आहे'', असे चोक्सी यांनी त्यांचे वकील संजय अब्बोट यांच्या माध्यमातून दिलेल्या पत्रात सांगितले. 

PNB

दरम्यान, पीएनबी गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर तपास यंत्रणांनी मेहुल चोक्सी यांची बँक खाती आणि इतर मालमत्ता गोठविली आहे. 

Web Title: Marathi News National News PNB Scam Mehul Choksi Letter to Employee