एनडीएच्या काळात पीएनबी घोटाळ्यात वाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

''मला या कर्जासाठी दबाव टाकण्यात आला होता. मात्र, मी तेव्हा माझ्या पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यानंतर मी माझ्या नाराजीबाबत गितांजली जेम्स् यांच्याविरोधात सरकारकडे तक्रार केली. याशिवाय 2013 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही याबाबत पत्र दिले. मला कर्ज मंजूर करण्यासाठी सांगण्यात आले होते''.

- अलाहाबाद बँकेचे माजी संचालक दिनेश दुबे

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकच्या मुंबईतील शाखेत 11 हजार 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. याबाबत अलाहाबाद बँकेचे माजी संचालक दिनेश दुबे यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) वर निशाणा साधला. ते म्हणाले, ''नीरव मोदी यांनी केलेला हा घोटाळा यूपीए सरकारच्या कार्यकाळात झाला. पण आता एनडीए सरकारच्या काळात हा घोटाळा 10-50 पटीने वाढला आहे''.  

सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील शाखेत 11 हजार 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. पीएनबीने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, पीएनबीच्या मुंबईतील एका शाखेमध्ये 1.8 अब्ज डॉलर म्हणजेच 11 हजार पाचशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुबे म्हणाले, ''मला या कर्जासाठी दबाव टाकण्यात आला होता. मात्र, मी तेव्हा माझ्या पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यानंतर मी माझ्या नाराजीबाबत गितांजली जेम्स् यांच्याविरोधात सरकारकडे तक्रार केली. याशिवाय 2013 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही याबाबत पत्र दिले. मला कर्ज मंजूर करण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यासाठी माझ्यावर दबावही टाकण्यात आला होता. पण मी त्यावेळी राजीनामा दिला''. 

दरम्यान, पीएनबीने दिलेल्या माहितीनुसार, बँकेतील काही ठराविक खात्यांच्या माध्यमातून फसवे आणि अनधिकृत व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही निवडक खातेधारकांच्या फायद्यासाठी हेतूपुरस्सर अनधिकृत व्यवहार झाले आहेत. बँकेकडून चौकशी सुरु करण्यात आली असून, याबाबतची पुढील माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Marathi News National News PNB Scam NDA Government UPA