नीरव मोदी हाँगकाँगमध्ये ; 'ईडी'ने व्यक्त केली शक्यता

वृत्तसंस्था
रविवार, 4 मार्च 2018

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक व्यवहार (पीएमएलए) कायद्यांतर्गत त्याच्यावर शनिवारी कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले. याबाबत विशेष न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील 12,600 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी व्यावसायिक नीरव मोदी याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर नीरव मोदीने परदेशात पलायन केले. नीरव मोदीला पकडण्यासाठी तपास यंत्रणा कार्यरत आहेत. नीरव मोदी सध्या हाँगकाँगमध्ये असेल, अशी शक्यता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) व्यक्त केली आहे.

Image result for PNB

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक व्यवहार (पीएमएलए) कायद्यांतर्गत त्याच्यावर शनिवारी कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले. याबाबत विशेष न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. ईडीचे वकिल हितेश वेनेगांवकर यांनी न्यायालयात सांगितले, की नीरव मोदीला मागील महिन्यात 15 फेब्रुवारी रोजी समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर मोदीकडून यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मोदीला हे समन्स ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात आले होते. त्यानंतर काल (शनिवार) अखेर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. 

Enforcement Directorate

दरम्यान, नीरव मोदी हा अमेरिकेत असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले जात होते. मात्र, यावर अमेरिकेने दुजोरा दिलेला नाही. त्यानंतर आता ईडीने नीरव मोदी हा हाँगकाँगमध्ये असल्याचे सांगितले. 

Web Title: Marathi News National News PNB Scam Nirav Modi is in Hongkong says Enforcement Directorate