तुमचा ब्रँड आमच्याच पैशातून ; 'पीएनबी'चे मोदीला पत्र

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 मार्च 2018

''तुम्ही जो ब्रँड निर्माण केला, तो आमच्या पैशातून स्थापन झाला आहे. त्यामुळे तुम्ही अशाप्रकारे गैरव्यवहार केल्याने मार्केटमध्ये नाव खराब झाले आहे''.  

- 'पीएनबी'चे नीरव मोदीला पत्र

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील विविध शाखांमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी व्यावसायिक नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांवर गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीएनबीने नीरव मोदीला पत्र लिहिले असून, या पत्रात ''तुम्ही जो ब्रँड निर्माण केला, तो आमच्या पैशातून स्थापन झाला आहे. त्यामुळे तुम्ही अशाप्रकारे गैरव्यवहार केल्याने मार्केटमध्ये नाव खराब झाले आहे''.  

PNB

 

'पीएनबी'च्या मुंबईतील विविध शाखांमध्ये 12600 कोटी रूपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर नीरव मोदीने पीएनबीला सेटलमेंट करण्याची ऑफर दिली होती. यासाठी त्याने पीएनबीला एक ई-मेल पाठवला होता. या ई-मेलमध्ये पीएनबीला 2000 कोटी रूपयांची ज्वेलरीसह इतर कोटींची ऑफर दिली होती. मात्र, पीएनबीने तुम्ही जो गैरव्यवहार केला तो या रकमेपेक्षा जास्त आहे, असे सांगितले. 

Nirav modi

''तुम्हाला या गैरव्यवहाराची माहिती होती. तरीदेखील तुम्ही या रकमेपैकी काही रक्कमच देण्याचे सांगितले. त्यामुळे असे वाटते, की तुम्ही उशिर लावून फक्त वेळ घेऊ इच्छित आहात'', असे 'पीएनबी'च्या सरव्यवस्थापक अश्विनी वत्स यांनी एका पत्राद्वारे सांगितले. 

Web Title: Marathi News National News PNB Scam Nirav Modi Mehul Chowksi Letter Writes