पीएनबी गैरव्यवहार ; गितांजली ग्रुपच्या चितळीया सीबीआयकडून ताब्यात

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

चितळीया यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना सीबीआयच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे चौकशीसाठी आणण्यात आले. मात्र, यामधील अन्य कोणत्याही विवरणाचा तपशील मिळाला नाही. तसेच पीएनबी गैरव्यवहारप्रकरणात चितळीया यांचा समावेश आहे का हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुंबई : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 'गितांजली ग्रुप ऑफ कंपनी'चे उपाध्यक्ष विपुल चितळीया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोट्यवधींच्या गैरव्यवहारात त्यांचा समावेश असल्याचा संशयावरून त्यांना सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Gijantjali Gems

चितळीया यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना सीबीआयच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे चौकशीसाठी आणण्यात आले. मात्र, यामधील अन्य कोणत्याही विवरणाचा तपशील मिळाला नाही. तसेच पीएनबी गैरव्यवहारप्रकरणात चितळीया यांचा समावेश आहे का हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. 12,636 कोटींच्या पीएनबी गैरव्यवहारप्रकरणी हिरे व्यावसायिक नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. 

दरम्यान, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यानंतर आता विपुल चितळीया यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे. 

Web Title: Marathi News National News PNB Scam Vipul Chitalia Detained by CBI