बिपलाब देब होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

बिपलाब देब यांची त्रिपुरा विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी देब हेच विराजमान होतील, हे स्पष्ट झाले आहे. त्यांचा शपथविधी शुक्रवारी होण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : त्रिपुरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले असून, भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. बिपलाब देब यांची त्रिपुरा विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी देब हेच विराजमान होतील, हे स्पष्ट झाले आहे. त्यांचा शपथविधी शुक्रवारी होण्याची शक्यता आहे. 

Biplab Kumar Deb

त्रिपुरा विधानसभेच्या 60 जागांपैकी 35 जागांवर भाजपचा विजय झाला. त्यामुळे बहुमताच्या जोरावर भाजपने सत्ता स्थापनेच्या दिशेने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी बिपलाब देब यांच्या नावावर तर उपमुख्यमंत्रिपदासाठी जिष्णू देब बर्मन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी गडकरी यांच्यासोबत केंद्रीय निरीक्षक जुअल ओरम हेदेखील होते.  

दरम्यान, देब हे मंगळवारी राज्यपाल तथगटा रॉय यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांचा शपथविधी अगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानात शुक्रवारी होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Marathi News National News Political News Biplab Kumar Deb will be the next CM Tripura