...म्हणून 'बसपा'चा 'सपा'ला पाठिंबा

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

''समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाची आघाडी ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नाही. मात्र, आम्हाला खात्री आहे, भाजप या पोटनिवडणुकीत पराभव होईल. तसेच राज्यसभेसाठीही कोणतीही आघाडी होणार नाही. आम्हाला विश्वास आहे, सप आणि काँग्रेस आमच्या उमेदवारांना पाठिंबा देतील''.

- एस. सी मिश्रा, राष्ट्रीय सरचिटणीस, बसप

लखनौ : उत्तरप्रदेशमध्ये लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे. मात्र, समाजवादी पक्षाला दिलेला हा पाठिंबा फक्त या पोटनिवडणुकांपुरताच असल्याचे बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस एस. सी मिश्रा यांनी सांगितले.

योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच केशव प्रसाद मौर्य यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आल्याने त्यांनीही त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला. योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिल्यामुळे गोरखपूर लोकसभेची जागा रिक्त झाली तर मौर्य यांनी राजीनामा दिल्यामुळे फुलपूर लोकसभेची जागा रिक्त झाली. या पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी बहुजन समाज पक्ष-समाजवादी पक्ष एकत्र आले आहेत. या रिक्त झालेल्या जागेसाठी 11 मार्च रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. 

''समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाची आघाडी ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नाही. मात्र, आम्हाला खात्री आहे, भाजप या पोटनिवडणुकीत पराभव होईल. तसेच राज्यसभेसाठीही कोणतीही आघाडी होणार नाही. आम्हाला विश्वास आहे, सप आणि काँग्रेस आमच्या उमेदवारांना पाठिंबा देतील'', असेही मिश्रा म्हणाले. 

Web Title: Marathi News National News Political News BSP supports SP for Bypoll Elections Only