फुलपूरमध्ये 'कमळ' कोमेजले : अखिलेश यादव

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 मार्च 2018

''काही ठिकाणी इव्हीएममध्ये दोष असल्याचे समोर आले. मात्र, जर इव्हीएममध्ये काही बिघाड नसल्यास सपाचा यापेक्षाही अधिक मतांनी विजय झाला असता. फुलपूरमध्ये कमळ कोमेजले आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा अहंकार कमी झाला. आता आशा आहे, भाजपची भाषाही बदलले''.

- अखिलेश यादव, नेते, समाजवादी पक्ष

लखनौ : उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि फुलपूर या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकांचे निकाल काल (बुधवार) जाहीर झाले असून, या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. तर समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतर पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''फुलपूरमध्ये कमळ कोमेजले. भाजपचा अहंकार कमी झाला. आता आशा आहे, भाजपची भाषाही बदलले''. 

Image result for Samajwadi party

लखनौ येथे आयोजित पत्रकार परिषदेत अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''काही ठिकाणी इव्हीएममध्ये दोष असल्याचे समोर आले. मात्र, जर इव्हीएममध्ये काही बिघाड नसल्यास सपाचा यापेक्षाही अधिक मतांनी विजय झाला असता. फुलपूरमध्ये कमळ कोमेजले आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा अहंकार कमी झाला. आता आशा आहे, भाजपची भाषाही बदलले''. ते पुढे म्हणाले, ''हा विजय देशातील गरीब, शेतकरी, दलित, अल्पसंख्यांक या सर्वांचा आहे''. 

Image result for BJP

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या का, असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता, अखिलेश यांनी राहुल गांधींनी आपल्याला या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगितले. तसेच आपण राहुल गांधी यांच्यासह मतदारांचे आभार मानल्याचे अखिलेश म्हणाले.  

Web Title: Marathi News National News Political News UP Election Result Bypoll Phulpur SP won Akhilesh Yadav