देशाची सीमा असुरक्षित : डॉ. मनमोहनसिंग

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

आज भारत जो काही आहे तो काँग्रेस पक्षामुळे आहे. भारताला काँग्रेसने घडवले आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर विकासाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलण्यात आली.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरची परिस्थिती हाताळण्यास मोदी सरकारचे व्यवस्थापन योग्य नाही. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही उद्भवली नाही. येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे हे सिद्ध झाले की आपल्या देशाची सीमा असुरक्षित आहे. पंतप्रधान आपला स्वत:चा प्रसार करत आहेत, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. 

manmohan singh

अखिल भारतीय काँग्रेसच्या 84 व्या महाअधिवेशात मनमोहनसिंग बोलत होते. यावेळी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मनमोहनसिंग यांनी भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, आज भारत जो काही आहे तो काँग्रेस पक्षामुळे आहे. भारताला काँग्रेसने घडवले आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर विकासाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलण्यात आली. विकास आणि सामाजिक न्यायासाठी अनेक आव्हानांना सामोरे जात आहोत. संरक्षण क्षेत्रातील खर्च जीडीपीच्या 1.6 टक्क्यांपेक्षा अधिक नसणार आहे.   

ते पुढे म्हणाले, मोदी म्हणाले होते की 6 वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. हा एक 'जुमला' असून, तो अद्यापही सिद्ध झालेला नाही. जेव्हा मोदीजी योजना आखत होते. तेव्हा त्यांनी सर्वांना मोठ-मोठी वचने दिली होती. त्यांनी दिलेली वचने अद्याप पूर्ण केलेली नाहीत. ते म्हणाले, होते की 2 कोटी रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यात येतील. मात्र, सध्या 2 लाख तरी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचे हेदेखील अजून दिसत नाही. 

Web Title: Marathi News National News Political News Manmohan Singh criticizes Modi Government