नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा नेफियू रियो

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 मार्च 2018

नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे अध्यक्ष नेफियू रियो यांची नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा निवड करण्यात आली. त्यामुळे नेफियू रियो हे चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी रियो यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

नवी दिल्ली : नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे अध्यक्ष नेफियू रियो यांची नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा निवड करण्यात आली. त्यामुळे नेफियू रियो हे चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी रियो यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. विशेष म्हणजे त्यांचा शपथविधी सोहळा राजभवनाबाहेर झाला. त्यामुळे राजभवनाबाहेर शपथ घेणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. 

CM Neiphiu Rio

नेफियू रियो यांचा शपथविधी सोहळा कोहिमा लोकल मैदानात संपन्न झाला. या शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिज्जू यांच्यासह इतर काही राजकीय नेते उपस्थित होते. रियो यांच्यासह 10 आमदारांनी पद आणि गोपनीयतची शपथ घेतली. दरम्यान, राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी रियो यांना 16 मार्चपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले.  

Web Title: Marathi News National News Political News Nagaland CM neiphiu rio