2025 पर्यंत टीबीला देशातून पूर्णपणे नष्ट करू : पंतप्रधान

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 मार्च 2018

''2025 पर्यंत भारतातून टीबी नष्ट करण्याचे आम्ही लक्ष्य ठेवले आहे. देशात टीबीसाठी कार्यक्रम, तसेच येत्या वर्षामध्ये आम्ही यावर 90 टक्के यश संपादन करण्यास सक्षम असू''.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : ''टीबी या आजाराला देशातून पूर्ण नष्ट करण्यासाठी उचलण्यात आलेले प्रत्येक पाऊल गरिबांच्या जीवनाशी निगडित आहे. टीबीच्या रूग्णांची योग्य ओळख व्हायला हवी. अशा प्रकरणाबाबत योग्यवेळी निदान व्हायला हवे. त्यामुळे संबंधित रुग्णांवर योग्यवेळी उपचार केले जाऊ शकतील''. तसेच ''2025 पर्यंत टीबी देशातून पूर्णपणे नष्ट करू'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सांगितले.

Image result for narendra

दिल्ली येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. यावेळी 'टीबी समिट'चे उद्घघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान म्हणाले, "रूग्णांना जी औषधे दिली जात आहेत, ती औषधे प्रभावी आहेत का, याची दक्षता घ्यायला हवी. त्यामुळे या सर्व गोष्टींवर लक्ष्य देत सरकारकडून व्यापक स्तरावर कार्य केले जात आहे. आम्ही टीबीला रोखण्यासाठी अयशस्वी झालेलो नाही. मात्र, 10-15 वर्षांनंतरही यावर नियंत्रण न मिळवता आल्याने आम्हाला आमचा दृष्टीकोन बदलावा लागणार आहे. त्यामुळे आपल्याला परिस्थितीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे''. 

ते पुढे म्हणाले, ''आम्ही 2025 पर्यंत भारतातून टीबी नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशात टीबीसाठी कार्यक्रम, तसेच येत्या वर्षामध्ये आम्ही यावर 90 टक्के यश संपादन करण्यास सक्षम असू'', असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

Web Title: Marathi News National News Political News PM Narendra Modi Speech on TB