रविशंकर, नड्डा यांच्यासह अन्य 7 मंत्री राज्यसभेत बिनविरोध

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

देशातील 16 राज्यांतील 58 जागांसाठी निवडणुका होत आहेत. बिहारच्या सहा जागांसाठी रविशंकर प्रसाद, संयुक्त जनता दलाचे वशिष्ठ नारायण सिंह आणि महेंद्र प्रसाद सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि अशफाक करीम, आणि काँग्रेसकडून अखिलेश प्रसाद यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड करण्यात आली. 

नवी दिल्ली : महाराष्ट्र, बिहार, गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिसा, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून सर्व उमेदवार राज्यसभेत बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यसभेसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज अंतिम तारीख होती. मात्र, उपलब्ध जागांपेक्षा अधिक उमेदवार नसल्याने मतदानाशिवाय हे सर्व उमेदवार राज्यसभेसाठी विजयी झाले आहेत. 

Voting india

संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतील 58 खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे येत्या 23 मार्च रोजी या रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, जे. पी. नड्डा आणि प्रकाश जावडेकर यांच्यासह अन्य सात केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. देशातील 16 राज्यांतील 58 जागांसाठी निवडणुका होत आहेत. बिहारच्या सहा जागांसाठी रविशंकर प्रसाद, संयुक्त जनता दलाचे वशिष्ठ नारायण सिंह आणि महेंद्र प्रसाद सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि अशफाक करीम, आणि काँग्रेसकडून अखिलेश प्रसाद यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड करण्यात आली. 

Rajya Sabha

दरम्यान, महेंद्र सिंह सातवी, वशिष्ठ नारायण तिसऱ्यांदा तर प्रसाद सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जाणार आहेत. राजद आणि काँग्रेसचे सदस्य पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार आहेत. 

Web Title: Marathi News National News Political News Rajya Sabha Election 7 Ministers Uncontested won